Ad will apear here
Next
‘डीकेटीई’च्या प्रा. सचिन लांडगे यांना पीएचडी
प्रा. सचिन लांडगेइचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये टेक्स्टाइल केमिस्ट्री विभागात कार्यरत असणारे प्रा. सचिन लांडगे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर फॅकल्टी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी अंतर्गत पीएचडी इन टेक्स्टाइल इंजिनीअरिंग ही पदवी प्राप्त झाली आहे. 

गेली १२ वर्षे ते ‘डीकेटीई’मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. डॉ. ए. आय. वासिफ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘स्टडी ऑन अ‍ॅप्लिकेशन ऑफ नॅनो मेटल कपांउंड्स फॉर सरफेस मॉडीफिकेशन ऑफ टेक्स्टाइल्स’ या विषयावर पीएचडी प्रबंध पूर्ण केला आहे. संशोधन करत असताना वापरात येणाऱ्या प्रतिजैविक वस्त्राची निर्मिती, त्यांचे विविध गुणधर्म, त्यांची उपयोगिता या संदर्भात त्यांनी सखोल अभ्यास केला. पीएचडी प्रकल्प पूर्ण करत असताना त्यांचे एकूण सात प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच लँबार्ट अ‍ॅकॅडमिक पब्लिशिंग, जर्मनी प्रकाशित ‘सिंथेसिस अँड अ‍ॅप्लिकेशन ऑफ नॅनोसिल्व्हर अ‍ॅज अ‍ॅन अँटीमायक्रोबिअल अजेंट’ या विषयावरील पुस्तकाचे त्यांनी लेखन केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी प्रा. लांडगे यांचे अभिनंदन केले असून, भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी ‘डीकेटीई’चे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZUJCA
Similar Posts
‘डीकेटीई’चे प्रा. प्रवीण उके यांना पीएचडी इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन टेक्नॉलॉजी विभागात कार्यरत असणारे प्रा. प्रवीण उके यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची फॅकल्टी ऑफ सायन्स अ‍ॅंड टेक्नॉलॉजीअंतर्गत पीएचडी इन टेक्स्टाइल इंजिनीअरिंग ही पदवी प्राप्त झाली आहे.
‘डीकेटीईचे शिक्षण व संशोधन अद्वितीय’ इचलकरंजी : ‘डीकेटीईचे शिक्षण आणि संशोधन देशात अलौकीक आहे. यामुळेच देश-विदेशांत या संस्थेचे नाव आघाडीवर आहे,’ असे उद्गार ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी काढले.
‘डीकेटीई’च्या प्रा. सोनाली सूर्यवंशी यांना पीएचडी इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये जनरल इंजिनीअरिंग विभागात कार्यरत असणाऱ्या प्रा. सोनाली सूर्यवंशी यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर फॅकल्टी ऑफ सायन्स अ‍ॅंड टेक्नॉलॉजीअंतर्गत पीएचडी. इन केमिस्ट्री ही पदवी प्राप्त झाली आहे.
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language